कर्मयोगी बाबा! आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण – अनिल राम सुतार

कर्मयोगी बाबा! आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण  – अनिल राम सुतार

आम्ही 1959 साली दिल्लीत आलो. तेव्हापासून इथेच राहतोय.  दिल्लीत बाबा म्हणजेच माझे वडील राम सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे. त्यांनी बरेच काम केलेय. जगभरातील 450 शहरांत त्यांच्या कलाकृती आहेत. अलीकडे आम्ही महाराष्ट्रातील मोठय़ा प्रकल्पावर  काम सुरू केलंय. बाबांच्या आजवरच्या कामाची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्राचा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर अशा दिग्गजांच्या मांदियाळीत बसण्याचा सन्मान बाबांना मिळालाय. आम्हा सर्व कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. नुकतीच बाबांनी वयाची शंभरी पूर्ण केली. या पुरस्काराने ते आनंदित झाले आहेत. या वयात त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझे काम सुरू आहे. अरबी समुद्रातील शिवरायांचा पुतळा, मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, इंदू मिल स्मारकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, पिंपरी-चिंचवड येथे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा या प्रोजेक्टवर मी आणि बाबा काम करतोय.  मागील अनेक वर्षे आम्ही एकत्र प्रोजेक्ट करतोय.  बाबांचे वय लक्षात घेता गेल्या 10 ते 15 वर्षांपासून मी स्टुडिओचे काम सांभाळतोय.

बाबांच्या मार्गदर्शनाखाली माझा कलाप्रवास सुरू झाला. लहानपणापासून मी शिल्प, पेंटिंग करत असे. बाबांनी मला नेहमीच पूर्ण मोकळीकता दिली. प्रोत्साहन, मार्गदर्शन करत राहिले. त्यांच्याच आशीवार्दाने मी परदेशातही प्रोजेक्ट डिझाईनमध्ये स्वतःची ओळख बनवली.  1994 मध्ये मी अमेरिकेतून मायदेशी परतलो. 12 वर्षे मी अमेरिकेत होतो. त्यादरम्यान मी त्यांना अमेरिकेत या असे म्हटलं, पण ते म्हणाले मी इथेच राहणार आहे. मग त्यांच्यासाठी मी सगळं सोडून परत आलो. त्यांना एकटे सोडू शकत नव्हतो. नोएडा येथे आमचा राम सुतार फाईन आर्ट प्रायव्हेट लिमिटेड स्टुडिओ आहे. सुरुवातीला बाबांसोबत काम करत आर्किटेक्चर करत होतो. एकवेळ अशी आली की आर्टमध्ये एवढे काम होतं की मी आर्किटेक्चर सोडून दिले.

लहानपणापासून वडिलांना भान हरपून काम करताना बघतोय. सकाळी साडेआठ नऊ वाजता त्यांचे काम सुरू व्हायचे. कलाकृती साकारणे म्हणजे इतिहास नव्या पिढीपर्यंत पोचवणे, बाबा तेच आयुष्यभर करत राहिले. ते कर्मयोगी आहेत. त्यांनी कधी पुरस्काराचा विचार केला  नाही, पैशाचा विचार केला नाही. ते नेहमी सांगतात, काम म्हणजे एखादं बी रुजवणं असतं. बी चांगलं उगवलं की त्याचं फळ मिळतं,  याच ध्येयाने त्यांनी काम केले आणि करत आहेत.

(शिल्पकार अनिल सुतार हे राम सुतार यांचे पुत्र आहेत.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;