अंधेरी, पवईत भीषण आग; चार जवान जखमी, सुदैवाने 60 जण बचावले

अंधेरी, पवईत भीषण आग; चार जवान जखमी, सुदैवाने 60 जण बचावले

अंधेरी आणि पवई येथे आग लागल्याची घटना गुरुवारी घडली. अंधेरी येथील इंडस्ट्रियल इस्टेटला लागलेल्या आगीत अग्निशमन  दलाचे चार जवान जखमी झाले तर पवईतील एका टॉवरला लागलेल्या आगीत 60 जण सुदैवाने बचावले आहेत.

अंधेरी पूर्व शांतीनगर येथील न्यू इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. आग विझविताना देवेंद्र यादव (30), तुषार हराड (25) प्रकाश इंगोले (30) आणि संध्या फराडे (34) हे चार अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले. तर पवईच्या साई सफिरे या 24 मजली इमारतीमध्ये 17 व्या मजल्यावर डक्टिंगमध्ये लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानांनी 50-60 जणांची सुखरूप सुटका केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;