फटाका सायलेन्सर विक्रेत्यांना हिसका ! बारामतीत वाहतूक पोलिसांची कारवाई

फटाका सायलेन्सर विक्रेत्यांना हिसका ! बारामतीत वाहतूक पोलिसांची कारवाई

बारामती वाहतूक पोलिसांनी फटाका बुलेटवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाच, आता वाहतूक शाखेने फटाका सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करत 16 फटाका सायलेन्सर ताब्यात घेत मुळावरच घाव घातला आहे. काही दुकानांमधून बुलेट चालक हे फटाका सायलेन्सर बसवून घेतात, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. याअनुषंगाने त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह बारामती शहरातील सायलेन्सर विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये तपासणी केली. या तपासणीत 16 सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यामध्ये बाइकर्स स्पेअर पार्टस ऑटोमोबाईल्स, महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स, महावीर ऑटोमोबाईल्स या तीन दुकानांमध्ये मोठ्या आवाजाचे सायलेन्सर मिळून आले. कारवाई सुरू केल्यापासून 51 सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस कर्मचारी सुभाष काळे, प्रदीप काळे, अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण, सीमा घुले, स्वाती काजळे, रेश्मा काळे, रूपाली जमदाडे, माया निगडे, सीमा साबळे आदींनी केली.

दिवसभरात 11 दुचाकीस्वारांवर कारवाई
फटाका सायलेन्सरवर कारवाई करण्याची मोहीम सुरू असताना आज (दि. १८) रोजी एका दिवसात कसबा, भिगवण चौक, नेवसे रोड, इंदापूर चौक परिसरात 11 बुलेट चालकांकडून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट गाड्या वापरणाऱ्या चालकांना आता सायलेंट सायलेन्सर वापरावे लागणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;