59 वर्षांच्या आजीबाईने सर केला एव्हरेस्ट

59 वर्षांच्या आजीबाईने सर केला एव्हरेस्ट

सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती एका महिलेची. या महिलेने एकटीने माऊंट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केला आहे. तिचे नाव आहे वासंती चेरुवेटिल आणि वय फक्त 59 वर्षे. आहे की नाही कमाल. केरळच्या वासंती चेरुवेटिल यांनी एकटीने एव्हरेस्टवर चढाई केली. तेही कोणतेही प्रशिक्षण न घेता. केवळ यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून त्यांनी टिप्स घेतल्या. त्यामुळेच त्या चर्चेत आल्या आहेत.

केरळची वासंती चेरुवेटिल व्यवसायाने शिंपी आहेत.  माऊंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी कुठलेही प्रोफेशनल ट्रेनिंग घेतले नाही. फक्त आव्हानांसाठी स्वतःला तयार केलं. त्यांनी यूट्यूबवरचे काही व्हिडीओ पाहिले आणि टिप्स घेतल्या. चार महिने त्यांची अशा पद्धतीने तयारी सुरू होती. या मोहिमेसाठी त्या 15 फेब्रुवारीला निघाल्या. वासंती चेरुवेटिल यांनी 15 फेब्रुवारी रोजी नेपाळमधील सुर्वे येथून आपले मिशन सुरू केले, तर 23 फेब्रुवारी रोजी त्या साऊथ बेस कॅम्पला पोहोचल्या. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला. या यशाबद्दल वासंती म्हणाल्या, मी तीन महिने सराव करत होते. दररोज संध्याकाळी 5 ते 6 तास पायी चालायचे. जेव्हा मी माझ्या मित्रमंडळींना सांगायचे की, मी एव्हरेस्टची तयारी करतेय, तेव्हा त्यांना विश्वास बसायचा नाही. या प्रवासात अनेक अडचणी आल्या. कधी हवामान खराब असायचे.

वासंती यांनी अरुंद रस्ते, खोल दरी, दम लागणे अशा अनेक समस्यांना तोंड दिले. त्या दिवसाला 6 ते 7 तास चढाई करायच्या आणि मोठा ब्रेक घ्यायच्या. त्यांना वेळ लागत होता. त्या काठीचा आधार घ्यायच्या. काही पावलं चालल्यानंतर थांबायच्या. वासंती यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एव्हरेस्ट मिशनचा फोटो शेअर केला असून तो खूप व्हायरल होतोय. फोटोमध्ये त्या पारंपरिक कसावू साडी परिधान करून तिरंगा फडकवताना दिसत आहेत. गेल्या वर्षी त्या थायलंडला गेल्या होत्या. आता त्याचे पुढचे ध्येय चीनच्या ग्रेट वॉलला भेट देणे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;