ऐकलं का? अशोक सराफ आता इन्स्टाग्रामवर

ऐकलं का? अशोक सराफ आता इन्स्टाग्रामवर

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या जगात पाऊल ठेवले आहे. त्यामुळे लाडक्या अशोक मामांविषयी अनेक घडामोडी चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पाहायला मिळतील. इन्स्टावर अकाऊंट उघडल्याची माहिती त्यांनी चाहत्यांना स्वतःच दिली आहे.  ashoksaraf_Official असे त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलचे नाव असून हे त्यांचे अधिकृत अकाऊंट आहे.

या नवीन अकाऊंटवरूनच अशोक सराफ यांनी त्यांच्या ‘अशी ही जमवाजमवी’ या नव्या चित्रपटाचा टीझरही टाकला आहे. अशोक सराफ यांचे अकाऊंट क्रिएट झाल्यानंतर अशोक सराफ यांना त्यांच्या चाहत्यांनी लगेच फॉलो केले. गेली कित्येक वर्षे अशोक सराफ आपल्या अभिनायाच्या जोरावर प्रेक्षकांचे मनोरंजन करत  आहेत. सध्या अशोक सराफ यांचे वय 77 वर्षे आहे. तरीही त्यांच्या अभिनयामध्ये तितकीच ऊर्जा पाहायला मिळते. ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धूमधडाका’, ‘बिनकामाचा नवरा’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चौकटराजा’ अशा विविधांगी सिनेमांमध्ये त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे.

कोणाकोणाला केले फॉलो

अवघ्या दोन दिवसांत अशोक सराफ यांना 10 हजारांहून अधिक लोकांनी फॉलो केले आहे, तर अशोक सराफ यांनी एकूण 38 लोकांना फॉलो केले आहे. सध्या एकूण 14 पोस्ट केल्या असून त्यांनी फॉलो केलेल्यांमध्ये पत्नी निवेदिता सराफ, वंदना गुप्ते यांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;