पुण्यात महिला पोलीस भरतीत चेंगराचेंगरी… मुख्यालयाचे गेट तुटले; नोकरीच्या शोधात भल्या पहाटे लाडक्या लेकींची गर्दी उसळली

पुण्यात महिला पोलीस भरतीत चेंगराचेंगरी… मुख्यालयाचे गेट तुटले; नोकरीच्या शोधात भल्या पहाटे लाडक्या लेकींची गर्दी उसळली

बेकारीचे अत्यंत भयंकर चित्र पुण्यात पाहायला मिळाले. पोलीस दलातील 531 जागांच्या भरतीसाठी आज पहाटे येथील पोलीस मुख्यालयाजवळ सुमारे चार हजार लाडक्या लेकींची गर्दी उसळली. यावेळी रेटारेटी, धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी झाली. त्यात मुख्यालयाचे गेट तुटल्याने एकच गोंधळ उडाला. त्यात अनेक मुली जखमी झाल्या असून काहींच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलिसांनी मात्र कुणीही जखमी झाले नसल्याचा दावा केला.

n शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयात आज कारागृह महिला पोलीस भरतीसाठी उमेदवारांची परीक्षा होणार होती. त्यासाठी चार हजार महिला उमेदवारांना बोलावण्यात आले होते.

n पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास गेटजवळ मोठी गर्दी झाली. मात्र तिथे पुरेशी व्यवस्था नसल्याने गोंधळ उडाला. त्यात रेटारेटीमुळे लोखंडी गेट तुटून स्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
n गेट तुटल्यानंतर चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली. धक्काबुक्की करत मुलींनी प्रवेश केला. त्यात अनेक जणींना दुखापत झाली आहे. काहींच्या पायाला गंभीर इजा झाली.

पोलीसपालकांत बाचाबाची

या मुली अनेक महिन्यांपासून या भरतीची तयारी करत होत्या. आपली लेक खाकी वर्दीत पाहण्याचे पालकांचे स्वप्न आहे. मात्र दोन वर्षांपासून भरती रखडत आहे. त्यात मुलींना बोलावून कोणतीच व्यवस्था केली नसल्याने पालक संतप्त झाले. पालक आणि पोलिसांत खटके उडाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;