Men’s Manicure- पुरुषांनी मॅनिक्युअर, पेडीक्योर करणे का गरजेचे आहे? वाचा सविस्तर

Men’s Manicure- पुरुषांनी मॅनिक्युअर, पेडीक्योर करणे का गरजेचे आहे? वाचा सविस्तर

महिलांसाठी त्यांची त्वचा आणि केस हे खूप महत्त्वाचे असतात. म्हणूनच त्या त्वचा आणि केसांच्या समस्यांपासून मूक्त होण्यासाठी नानाविध उपाय करतात. वेळोवेळी मॅनिक्युअर आणि पेडीक्योरच्या मदतीने महिला कायमच स्वतःच्या हाताची आणि पायांची काळजी घेतात. असे असले तरी, पुरुष त्वचेची काळजी घेण्यासाठी वेळ काढत नाहीत. त्यामुळेच पुरुषांच्या हातांची आणि पायांची त्वचा टॅन झालेली दिसते. पुरुषांनीही त्यांच्या त्वचेकडे लक्ष दिले पाहिजे आणि वेळोवेळी मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करून घेतले पाहिजे.

पुरुषांसाठी मॅनिक्युअर आणि पेडीक्योरचे फायदे

मॅनिक्युअर आणि पेडीक्योरमुळे हाताच्या बोटांवर, पायांच्या बोटांवर आणि अंगठ्यांमध्ये साचलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. हाताची आणि पायाची मृत त्वचा यामुळे निघण्यास मदत होते. या दोन्ही ट्रिटमेंटमुळे हात आणि पायांमध्ये बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो. घरच्याघरी करण्यासाठी, तुमचे हात आणि पाय कोमट पाण्यात १० ते १५ मिनिटे ठेवा. या पाण्यात तुम्ही लैव्हेंडर तेल देखील घालू शकता.

 

 

आपल्या हातापायांची नखे कधीकधी तुटतात. त्यामुळे अशावेळी संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

 

मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करता तेव्हा नखे ​​ट्रिम राहतात आणि ती तुटण्याची शक्यता कमी होते.

 

नखे ​​न कापल्यामुळे ती बोटाच्या आतल्या भागामध्ये वाढू लागतात. परंतु मॅनिक्युअर आणि पेडीक्योर केल्यामुळे नखांची लांबी तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता, त्यामुळे अनेक समस्या टाळता येतात.

 

ऑफिसमध्ये पुरूषांना खूप काळासाठी बूट घालावे लागतात. अशा परिस्थितीत पायांना दुर्गंधी येऊ लागते. जास्त वेळ शूज घालल्याने पायांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता सर्वाधिक वाढते. त्यामुळे पुरुषांच्या पायांची दुर्गंधी पेडीक्योर करून कमी करता येते. त्याचबरोबर स्वच्छता देखील राखली जाते.

पेडीक्योर करताना पायांच्या तळव्यांवर अ‍ॅक्युप्रेशर लावला जातो. त्यामुळे ताण तणावापासून आराम मिळतो. पेडीक्योर केल्यानंतर ताजेतवानेही वाटते.

 

मॅनिक्युअर आणि पेडीक्योर केल्यानंतर हात आणि पायाच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात. त्यामुळे नंतर नवीन त्वचा येते तसेच त्वचेवरील टॅनिंगही दूर होते. हाताच्या आणि पायाच्या त्वचेला चमक आणण्यासाठी मॅनिक्युअर आणि पेडीक्योर करणे गरजेचे आहे.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;