बाराशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, कंट्रोल रूममधून ठाणे ग्रामीणच्या गुन्हेगारीवर वॉच

बाराशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, कंट्रोल रूममधून ठाणे ग्रामीणच्या गुन्हेगारीवर वॉच

 

आता ठाणे ग्रामीणच्या गुन्हेगारीवर वॉच ठेवला जाणार आहे. ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, शाळा आणि सरकारी आस्थापना येथील बाराशे सीसीटीव्ही कॅमेरे कंट्रोल रूममध्ये जोडले आहे. त्यामुळे आता गुन्हेगारांची काही खैर नाही. महिला सुरक्षा, वाहतूककोंडी आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या कंट्रोल रूमची मदत होणार आहे.

ठाणे ग्रामीण पोलिसांनी ‘एक सीसीटीव्ही आपल्या सुरक्षिततेसाठी’ हा उपक्रम हाती घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेल्या खासगी व शासकीय आस्थापनांची भेट घेतली. यावेळी ११ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ४ हजार ५०० कॅमेऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यात इंटरनेटद्वारे जोडलेल्या जवळपास बाराशे कॅमेऱ्यांचे पोलिसांनी थेट कंट्रोल रूममध्ये अॅक्सेस घेतले आहेत.

कॅमेऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांनी १५ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून हे कर्मचारी २४ तास कार्यरत राहणार आहेत. आज पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण येथे उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाचे कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी व अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे उपस्थित होते.

सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात १० सीसीटीव्ही स्क्रिन उभारण्यात आल्या आहेत. या स्क्रिनच्या मदतीने पोलीस हायवे, ज्वेलर्स, दुकाने, हॉटेल्स, पेट्रोल पंप, घराबाहेरील कॅमेरे, शाळा-कॉलेज, मंदिर, एसटी स्टॅण्ड अशा विविध ठिकाणी करडी नजर ठेवणार आहेत. तीन शिफ्टमध्ये गरजेनुसार प्रत्येक ठिकाणी ही नजर ठेवली जाणार आहे. भविष्यात या स्क्रिनची आणि कॅमेऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी दिली.

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;