कानपूरमध्ये सायबर चोरालाच 10 हजार रुपयांना गंडवले

कानपूरमध्ये सायबर चोरालाच 10 हजार रुपयांना गंडवले

कानपूरमध्ये एक रंजक घटना घडलीय. एका सायबर ठकाला एक महाठक भेटला आणि त्याने 10 हजार रुपयांना सायबर ठकाला गंडवले आहे. 6 मार्च रोजी भूपेंद्र नावाच्या तरुणाला एक कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे  सांगितले. भूपेंद्रविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे त्याने सांगितले.

भूपेंद्रला घाबरविण्यासाठी काही फोटो आणि व्हिडीओदेखील पाठवले. तसेच या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी 16 हजार रुपयांची मागणी केली. भूपेंद्रला या सगळ्या प्रकाराचा संशय आला. भूपेंद्रने सायबर चोराला सांगितले की, त्याच्याकडे एक सोन्याची चेन आहे, ती विकून तो त्याला पैसे देईल. त्यासाठी त्याला तीन हजार रुपयांची गरज आहे. त्याने तीन हजार रुपये भूपेंद्रच्या अकाऊंटवर ट्रान्स्फर केले. त्याच वेळी भूपेंद्रने आपल्या एका मित्राला ज्वेलर बनवून सायबर चोराशी बोलायला सांगितले. अशा पद्धतीने गोड गोड बोलून सायबर चोराकडून एकूण 10 हजार रुपये आपल्या खात्यात ट्रान्स्फर करून घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;