गच्चीवर उद्यान बंधनकारक, नव्या इमारतीच्या परवानगी अर्जात अट

गच्चीवर उद्यान बंधनकारक, नव्या इमारतीच्या परवानगी अर्जात अट

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वाढणारे तापमान आणि प्रदूषण कमी करण्यासाठी आता नव्या इमारतींना टेरेस गार्डन उभारणे बंधनकारक करण्यात येणार आहे. यामुळे वाढता उकाडा आणि प्रदूषणाला नैसर्गिकरीत्या प्रतिबंध घालता येणार आहे. नव्या इमारतींना परवानगी देताना ही अट अर्जामध्ये समाविष्ट केली जाईल. याबाबतचा प्रस्ताव महानगरपालिकेने नगरविकास विभागाकडे पाठवला आहे.

मुंबईत वाढणारे तापमान, प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये रस्ते धुलाई, स्वच्छता, स्प्रिंक्लरने फवारणी यांचा समावेश आहे.

जुनी इमारत मजबूत असली तर गार्डन

नव्या इमारतींचे प्लॅन पालिकेला सादर करतानाच अर्जामध्ये राखीव जागा आणि टेरेस गार्डन तयार करण्याची अट घातली जाईल. तर जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून मजबुती असेल तरच टेरेसवर गार्डन उभारता येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

इमारतीच्या 5 टक्के जागेत मियावाकी वने

  • मुंबईला हिरवेगार करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून मियावाकी वने तयार करण्यात येत आहेत. या वनांमध्ये काही दिवसांत झाडे मोठी होत असल्याने हिरवाई वाढत आहे.
  • याच पार्श्वभूमीवर आता इमारतींच्या आवारात किमान 5 टक्के जागा मियावाकी वनांसाठी राखीव ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
  • बांधकामातून उडणाऱया धुळीमुळे प्रदूषण होत असल्याने रस्तेकाम, बांधकामांसाठी 29 प्रकारच्या अटींची नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये बांधकामे 20 ते 30 फूट बंदिस्त करून काम करण्यास परवानगी देण्यात येत आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;