Ratnagiri News – 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

Ratnagiri News – 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे रत्नागिरीत धरणे आंदोलन

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा. या निर्णयामुळे भविष्यात शाळेत शिक्षक उपलब्ध होणार नाहीत. या निर्णयामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. म्हणून 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा या मागणीसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती रत्नागिरीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. सरकारच्या शिक्षक विरोधी धोरणाविरोधात जोरदार घोषणा देत आज प्राथमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.

15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाने संच मान्यता निश्चित करण्यात आली आहे. शिक्षण कायद्यातील तरतुदीच्या आणि 28 ऑगस्ट 2015 च्या विसंगत अशा निर्णयाने शाळांमध्ये शिक्षकच असणार नाहीत. यामुळे राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. शाळेत शिक्षक उपलब्ध नसल्याने गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांसाठी परगावातील किंवा खासगी शाळेत प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारा 15 मार्च 2024 चा शासन निर्णय रद्द करा अशी मागणी करत आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती रत्नागिरीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले.

यावेळी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, संतोष पावणे, राजेश शिर्के, अरविंद जाधव, पंकज जोशी, अंजली धामापूरकर आणि इतर शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

20 पटसंख्येला एक शिक्षक ही विसंगती

शालेय शिक्षण विभागाने 6 वी व 7 वी इयत्तेची पटसंख्या 20 किंवा 20 पेक्षा कमी असेल त्यांना एक नियमित शिक्षक मंजूर केला आहे. ही गोष्ट शिक्षण हक्क कायद्याला विसंगत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती रत्नागिरीने आपल्या निवेदनात केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;