विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट म्हणून महायुतीचा विजयही डुप्लिकेट -अनिल देशमुख

विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट म्हणून महायुतीचा विजयही डुप्लिकेट -अनिल देशमुख

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. विधासभेच्या निवडणुकीत ईव्हीएम डुप्लिकेट, मतदार याद्या डुप्लिकेट म्हणून त्यांचा विजय सुद्धा डुप्लिकेट झाला आहे. एक बाहुल गेलं आणि दुसरं बाहुल आलं अशी परिस्थिती सध्या इलेक्शन कमिशनची आहे. निवडणुकीच्या काळात भारतीय जनता पार्टीने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे आश्वासनं दिले होते. आता त्यांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे, अशी टीकाही अनिल देशमुख यांनी केली.

आमचं सरकार आलं तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं भाजपने सांगितलं होतं. पण आता चार महिने झाले आहेत, शेतकरी आता कर्जमाफीची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी तुम्ही वीस हजार कोटी रुपये खर्च करू शकत नाहीत? असा हल्लोबोल यावेळी अनिल देशमुख यांनी केला आहे. सरकार लाडक्या बहिणींचे पैसे 2100 रुपये करणार होते, ते 2100 तर केलेच नाहीत, मात्र या योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आलं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. तूम्ही जर गुंडांना संरक्षण द्याल तर राज्यात कायदा व सुव्यवस्था कशी राहील? असा सवालही त्यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील जनता या प्रशासक राजला आता कंटाळली आहे, त्यामुळे राज्य शासनाने महानगरपालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. सरकार कायद्याची बाजू मांडण्यात कमी पडते का? हे सुद्धा तपासून घेतलं पाहिजे, अशी टीकाही देशमुख यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;