नागोठण्यातील प्रवाशांना उन्हात उभे राहण्याची ‘शिक्षा, प्रवासी शेड नसल्याने अबालवृद्धांचे हाल

नागोठण्यातील प्रवाशांना उन्हात उभे राहण्याची ‘शिक्षा, प्रवासी शेड नसल्याने अबालवृद्धांचे हाल

नागोठणे एसटी स्थानकात पाली-कोलाडला जाणाऱ्या मार्गावर निवारा शेड न बांधल्याने असंख्य प्रवाशांना रणरणत्या उन्हात उभे राहण्याची ‘शिक्षा’ भोगावी लागत आहे. पाली, कोलाड व नागोठणे या मार्गावर रोज अनेकजण प्रवास करत असतात. पण त्यांच्यासाठी कोणतीही सोय करण्यात आलेली नाही. त्यामुळे बसची वाट पाहण्यासाठी भरउन्हामध्ये ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्याचा मोठा फटका शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणारे विद्यार्थी, महिला, वृद्ध, व्यापारी, व्यावसायिक यांना बसत आहे.

नागोठणे हे एस.टी. स्थानक म्हणजे राज्य परिवहन मंडळाचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणाहून नागोठणे, पनवेल, ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, शिर्डी तसेच कोकणातील श्रीवर्धन, महाड-पोलादपूर येथे जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्या या स्थानकामध्ये ये-जा करत असतात. खरेदीसाठी जाणाऱ्या खेडेगावातील नागरिकांचेही मोठ्या प्रमाणावर ये-जा नेहमीच चालू असते. या ठिकाणी निवारा शेड नसल्याने वयोवृद्ध, लहान मुले, महिला, शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसची वाट बघत उभे राहावे लागते.

बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत

पाली व पुण्याकडे जाणारे प्रवासी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांचा आधार घेऊ शकतात. परंतु महाड, श्रीवर्धनसह कोकणात तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना कोणताच आधार नाही. बस स्थानकात बसण्याची व्यवस्था आहे. मात्र समोर कोणती बस आली आहे ते दिसत नाही. त्यामुळे प्रवाशांना बस पकडण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. निवासी शेड नसल्याने प्रवाशांना पावसात उभे राहून वाहनांची वाट बघावी लागते. या ठिकाणी तातडीने सर्व सोयींयुक्त प्रवासी शेड बांधावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;