गुलमर्ग फॅशन शोच्या आयोजकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

गुलमर्ग फॅशन शोच्या आयोजकांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

गुलमर्ग  फॅशन शोचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरच्या एका न्यायालयाने गुलमर्गमधील फॅशन शोच्या आयोजकांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. रमजान महिन्यात अश्लीलता पसरवणे, धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि सार्वजनिकरित्या मद्यपान केल्याबद्दल आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी राजकीय कार्यकर्ते आदिल नझीर खान यांनी केली. त्यांच्या तक्रारीनुसार, आयोजक, डिझायनर्स आणि शोमध्ये सहभागी झालेल्या मॉडेल्सना नोटीस पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 8 एप्रिल रोजी होणार आहे.

न्यायालयाने म्हटले की, आरोपीचे म्हणणे ऐकणे हे कायद्याने बंधनकारक आहे. याबाबत प्रकरणाशी संबंधित सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या आठवडय़ात गुलमर्गमध्ये एक फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. सोशल मीडियावर याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चांगलेच तापले आणि यावरून राजकारण सुरू झाले. स्थानिक लोकांनीदेखील नाराजी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;