सासरच्या मंडळींनी गाठला क्रूरतेचा कळस; हुंड्यात 21 लाख आणि आलिशान कार, विवाहितेवर लक्ष ठेवण्यासाठी बसवले कॅमेरे

सासरच्या मंडळींनी गाठला क्रूरतेचा कळस; हुंड्यात 21 लाख आणि आलिशान कार, विवाहितेवर लक्ष ठेवण्यासाठी बसवले कॅमेरे

हुंडय़ात 21 लाख रुपये आणि फॉर्च्युनर गाडी न मिळाल्याने सासरच्यांनी विवाहित महिलेला मारहाण केली. विवाहितेवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले. सासरच्या मंडळींच्या क्रूरतेने कळस गाठला. उत्तर प्रदेशातील ही धक्कादायक घटना आहे.

विजय नगर पोलीस स्टेशन परिसरातील तरुणीचा विवाह दोन वर्षांपूर्वी कवी नगर भागातील तरुणाशी झाला होता.  तिच्या कुटुंबाने लग्नात 45 लाख रुपये खर्च केले आणि हुंडा म्हणून रोख रक्कम, दागिने, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि एक कार दिली. लग्नानंतर तिच्या सासरच्या मंडळींच्या मागण्या वाढल्या. अवघ्या 15 दिवसांनी पतीने तिच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली. पीडीत मुलीच्या वडीलांनी पाच लाख रुपये दिले. यानंतरही सासरच्या मंडळींची हाव सुटेना. त्यांनी 21 लाख रुपये रोख आणि फॉर्च्युनर कारची मागणी केली.

या मागण्या मुलीच्या माहेरच्या लोकांनी पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला मारहाण केली. शिवीगाळ करण्यात आली आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.  गेल्या वर्षी जानेवारीमध्ये पीडितेने मुलाला जन्म दिला. पण तरीही विवाहितेच्या सासरच्या लोकांच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. तिच्या सासरच्यांनीही तिचा विनयभंग केला,असा आरोपही विवाहितेने केला. त्रासलेल्या पीडितेने या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;