लंडनमध्ये हायगेट स्मशानभूमीत 16 मार्चला डॉ. अशोक ढवळे यांचे कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान

लंडनमध्ये हायगेट स्मशानभूमीत 16 मार्चला डॉ. अशोक ढवळे यांचे कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान

14 मार्च 2025 हा कार्ल मार्क्स यांचा 142 वा स्मृतिदिन आहे. मार्क्स यांच्या मृत्यूप्रसंगी त्यांना आदरांजली वाहणारे अप्रतिम भाषण 17 मार्च 1883 रोजी त्यांचे अत्यंत जिवलग मित्र कॉम्रेड फ्रेडरिक एंगेल्स यांनी लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत केले होते. त्यानंतर दरवर्षी 14 मार्च या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मार्क्स स्मृती व्याख्यान लंडनच्या हायगेट स्मशानभूमीत आयोजित केले जाते. त्याचे आयोजन गेली अनेक वर्षे ब्रिटिश कम्युनिस्ट पक्ष आणि लंडनची मार्क्स मेमोरियल लायब्ररी संयुक्तपणे करतात. जगभरातील कम्युनिस्ट नेते आणि मार्क्सवादी विचारवंतांना हे व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले जाते.

यंदा 2025 चे मार्क्स स्मृती व्याख्यान देण्याचा मान मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांना मिळाला आहे. समाजसत्तावादी क्युबाच्या ब्रिटनमधील राजदूत इस्मारा वर्गास वॉल्टर या सुद्धा असेच व्याख्यान तेथे देतील. ब्रिटनमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 15-16 मार्च रोजी होणाऱ्या त्रैवार्षिक अधिवेशनासही डॉ. अशोक ढवळे हे पॉलिट ब्यूरोतर्फे हजर राहून संबोधित करतील.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;