… तर पंतप्रधानांनी छातीठोकपणे सांगावे की गोळवलकर गुरुजींनी जे लिहलंय ते चुकीचं आहे, संजय राऊत यांचे मोदींना आव्हान

… तर पंतप्रधानांनी छातीठोकपणे सांगावे की गोळवलकर गुरुजींनी जे लिहलंय ते चुकीचं आहे, संजय राऊत यांचे मोदींना आव्हान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रम आणि बलिदानाची गाथा सांगणाऱ्या सिनेमाचे कौतुक केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यांना गुरू मानतात त्या गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात लिखान केले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांना एक आव्हान केले आहे.

”छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत गोळवलकर गुरुजींनी जी भूमिका मांडलीय ती मोदींनी ऐकली पाहिजे. त्यानंतर मोदीजींनी छातीठोकपणे सांगितलं पाहिजे की गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे लिहलंय ते चुकीचं आहे व त्यांचा निषेध करायला हवा”, असे आव्हान संजय राऊत यांनी केले आहे.

”प्रधानमंत्र्यांची काय विचारधारा आहे ती सांगू शकत नाही. नुकताच एक चित्रपट बनला आहे. जेव्हा एक ऐतिहासिक फिल्म बनते तेव्हा चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माता त्यातून सत्य समोर आणायचा प्रयत्न करतो. मोदींनी गेल्या दहा वर्षात अनेक चित्रपटांचे त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी मार्केटींग केलेय. कश्मीर फाईल्स, ताश्कंद फाईल्स, अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर, अशा चित्रपटांना प्रमोट करण्याचे काम भाजपने केलेय. छावा चित्रपटाच्या निर्माणात मोदीजींचे व भाजपचे काहीही योगदान नाही. या चित्रपटाच्या शेवटच्या भागावरून लोकं भावूक झाले आहेत. तेच पाहून मोदीजींनी पंतप्रधान म्हणून नाही तर राजकीय नेते म्हणून यात उडी मारली. मात्र छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत गोळवलकर गुरुजींनी जी भूमिका मांडलीय ती मोदींनी ऐकली पाहिजे. त्यानंतर मोदीजींनी छातीठोकपणे सांगितलं पाहिजे की गोळवलकर गुरुजींनी छत्रपती संभाजी महाराजांवर जे लिहलंय ते चुकीचं आहे व त्यांचा निषेध करायला हवा. कारण छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत”, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;