चीन बॉर्डरवर अरुणाचलमध्ये रस्ता बनविताना सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात, कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण

चीन बॉर्डरवर अरुणाचलमध्ये रस्ता बनविताना सैन्यदलाच्या वाहनाचा अपघात, कोल्हापूरच्या जवानाला वीरमरण

चीन बॉर्डरवर अरुणाचलमध्ये रस्ता बनविताना सैन्यदलाचे वाहन 400 ते 500 फूट खोल दरीत कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात कोल्हापूरचे जवान सुनिल विठ्ठल गुजर यांना वीरमरण आले. त्यामुळे जिल्ह्यासह गुजर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसलळा आहे.

जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुनिल गुजर सन‌ 2019 मध्ये सैन्यदलात भरती झाले होते. 110 इंजिनीयर रेजिमेंट बॉम्बे इंजिनियर ग्रुपचे जवान सुनील गुजर हे डोजर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. गुरुवारी 13 मार्च रोजी दुपारी चायना बॉर्डरवर अरुणाचलमध्ये रोड कटिंग करताना, त्यांचा डोजर स्लाइडिंग होऊन 400 ते 500 फूट खाली कोसळला. त्या अपघातात सुनिल गुजर यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी (14 मार्च) संध्याकाळपर्यंत अरुणाचल दिब्रुगड येथील आरोचमध्ये येईल. त्यानंतर त्यांच्या कोल्हापूर येथील मूळ गावी येईल. वीरजवान सुनील गुजर‌ यांच्या पश्चात पत्नी स्वप्नाली आणि पाच महिन्यांचा लहान मुलगा व‌ भाऊ असा परिवार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;