Shamita Shetty : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यामुळे शिल्पा शेट्टीची बहिणी वयाच्या 46 व्या वर्षीही एकटीच, तो मात्र…

Shamita Shetty : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यामुळे शिल्पा शेट्टीची बहिणी वयाच्या 46 व्या वर्षीही एकटीच, तो मात्र…

Shamita Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने उद्योजक राज कुंद्रा याच्यासोबत लग्न करुन संसार थाटला. शिल्पा आज पती आणि मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण शिल्पा हिची बहीण आणि अभिनेत्री शमिता शेट्टी वयाच्या 46 व्या वर्षी देखील एकटीच आहे. शमिता शेट्टी हिच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री झाली नाही असं नाही. पण सेलिब्रिटींसोबत शमिताच्या नावाची चर्चा रंगली. पण कोणत्याच सेलिब्रिटीसोबत शमिताचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. शमिता शेट्टी हिला खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यात देखील यश मिळालं नाही.

शमिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘बिग बॉस’च्या माध्यमातून अभिनेत्रीच्या आयुष्यात अभिनेता राकेश बापट याची एन्ट्री झाली. बिग बॉस शो संपल्यानंतर देखील दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या ब्रेकअपची देखील तुफान चर्चा रंगली.

राकेश बापट याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीचं नाव अभिनेता अमिर अली याच्यासोबत जोडण्यात आलं. ज्यावर अभिनेत्रीने मौन सोडलं होतं. सध्या अभिनेत्री सिंगल पण आनंदी आयुष्य जगत आहे. पण अभिनेत्याच्या आयुष्यात असा एक व्यक्ती होता, ज्यामुळे शमिता आजही एकटी आहे.. असं अनेकदा समोर आलं.

अभिनेत्रीच्या आयुष्यातील ‘तो’ खास अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता मनोज वाजपेयी आहे. शमिता आणि मनोज यांनी ‘फरेब’ आणि ‘बेवफा’ या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. याच दरम्यान दोघांमध्ये प्रेम बहरलं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही.

जेव्हा शमिता आणि मनोज यांच्या नात्याच्या चर्चा रंगत होत्या तेव्हा मनोज विवाहित होते. याच कारणामुळे शमिताने मनोज यांच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. यानंतर शमिताने लग्न करण्याचा निर्णय घेतलाच नाही. अभिनेत्री आजही एकटी आयुष्य जगत आहेत. पण मनोज त्याच्या वैवाहिक आयुष्यात आनंदी आहे.

शमिता बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असते. शिवाय चाहत्यांना देखील फिट राहण्याचं आवाहन अभिनेत्री करत असते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;