Chhaava Movie- वाह छावा!!! भाषेची बंधनं झुगारत ‘छावा’ चित्रपट तेलगू भाषेतही ठरतोय सुपरहिट! अवघ्या आठवड्याभरात इतक्या कोटींची कमाई

Chhaava Movie- वाह छावा!!! भाषेची बंधनं झुगारत ‘छावा’ चित्रपट तेलगू भाषेतही ठरतोय सुपरहिट! अवघ्या आठवड्याभरात इतक्या कोटींची कमाई

सिनेमा हे असं माध्यम आहे ज्याच्यासाठी भाषा ही केवळ नाममात्र असते. सिनेमामध्ये भाषेव्यतिरिक्त प्रेक्षकांशी संवाद साधण्याची किमया असते. भाषा ही सिनेमाच्या दृष्टीने एक जुजबी गरज आहे. हेच ‘छावा’ या चित्रपटाने सिद्ध केले आहे. छावा चित्रपट तेलगू भाषेत प्रदर्शित झाला आणि तेलगू भाषिकांच्या मनाचाही ‘छावा’ने ठाव घेतला. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा तेलगू भाषेत प्रदर्शित झाल्यानंतर छावाने चांगलीच मुसंडी मारली आहे.

 

तेलगू रसिक प्रेक्षकांनी कायमच चांगल्या कलाकृतींना मनमुराद दाद दिलेली आहे. हेच ‘छावा’ या चित्रपटाच्या बाबत लागू पडलेले आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित ऐतिहासिक महाकाव्य गीता आर्ट्स निर्मित तेलुगू भाषेत ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाला. तेलगू भाषेत प्रदर्शित झाल्यानंतर ‘छावा’ने पहिल्या दोन दिवसांमध्येच जोर धरला होता. तो जोर अगदी आठवडा उलटल्या नंतरही कायम आहे.

‘छावा’ची तिकीटबारीवरील जोरदार बॅटींग चालल्यामुळे, तेलगू प्रेक्षकांनी चॅम्पियन्स ट्रॉफीपेक्षा ‘छावा’लाच जास्त पसंती दिली. ट्रॉफी भारताने स्वतःकडे खेचून आणली त्यादिवशी तेलगू चित्रपटगृहांमध्ये क्रिकेटपेक्षा प्रेक्षकांनी ‘छावा’ला पसंती देत थिएटर्सही हाऊस फुल्ल केली होती. त्यामुळेच अवघ्या आठवड्याभरातच ‘छावा’ने भाषेची सर्व बंधनं झुगारत तेलगू भाषेतही छप्परफाड कमाई करत 12 कोटींचा गल्ला जमवला.

डब असलेल्या सिनेमांना फारसा प्रतिसाद मिळत नाही. परंतु ‘छावा’ मात्र याला अपवाद ठरला. ‘छावा’चे तेलगूमध्ये डबिंग हे गीता आर्ट्स या निर्मिती संस्थेने विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे आव्हान अगदी लीलया पेलले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ तेलगू भाषेतही मोठे यश मिळवत आहे. प्रेक्षक विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना या प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;