‘माझं काही खरं नाही’, म्हणणारे जयंत पाटील बारामतीत शरद पवार यांना भेटले; सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा

‘माझं काही खरं नाही’, म्हणणारे जयंत पाटील बारामतीत शरद पवार यांना भेटले; सुप्रिया सुळे यांच्याशीही चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली होती. दुसरीकडे भाजप आणि अजित पवार गटाकडूनही जयंत पाटील यांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान जयंत पाटील यांनीही ‘माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही’ असे म्हणत एक मोठे विधान केले होते. त्यामुळे त्यांच्या मनात नक्की चाललेय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या सर्व चर्चा सुरू असतानाच जयंत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी शरद पवार यांची भेट घेतली. दोन्ही नेते बारामतीमध्ये एकत्र दिसले. तत्पूर्वी सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यातही तासभर चर्चा झाली.

बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्रातील उसाच्या शेतीची त्यांनी पाहणी केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चाही झाली.

दरम्यान, जयंत पाटील यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली होती. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला टोला लगावला होता. जयंत पाटील यांच्यासोबत तासभर चर्चा झाली असून राज्याच्या दौऱ्याबाबत नियोजन आम्ही केले आहे. इतकी मोठी संघटना, इतका मोठा पक्ष असूनही त्यांना जयंत पाटील हवेहवेसे वाटत आहेत, ही मोठी कॉम्प्लिमेंट आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजितदादा गटाला लगावला.

राष्ट्रवादीत प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा; जयंत पाटील म्हणाले, तर आठ दिवसांत राजीनामा देतो

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;