सत्या बोल की रं माझ्याशी; अक्षय खन्नाबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर संतोष जुवेकरवर मीम्सचा वर्षाव
गेल्या काही दिवसापासून एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटाचे नाव ‘छावा’ असे आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार दिसले आहे. अभिनेता संतोष जुवेकरने रायाजी या भूमिकेत दिसत आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये ‘मी अक्षय खन्नाशी बोललोच नाही’ असे म्हटले. आता त्याला यावरून ट्रोल केले जात आहे.
संतोषने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “छावा सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या आहेत त्या कोणाशीच मी बोललो नाही. शूटिंग सुरु असताना मी तरी त्यांच्याशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचे शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो, बोललो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंपण नाही. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List