TCS कडून एका रिअल इस्टेट कंपनीचे अधिग्रहण; 2,250 कोटींना झाले डील
टाटा समुहाची नावाजलेली कंपनी TCS ने व्यवसायवाढीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलेले आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने दर्शिता सदर्न इंडिया हॅपी होम्सचे अधिग्रहण करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही घोषणा केली. टीसीएसच्या एक्सचेंज फाइलिंगनुसार, या अधिग्रहणाची किंमत 2,250 कोटी रुपये आहे.
दर्शिता सदर्न इंडिया हॅपी होम्स ही एक व्यावसायिक रिअल इस्टेट कंपनी आहे. टीसीएस दर्शिता सदर्न इंडिया हॅपी होम्सची जमीन आणि इमारत देखील विकत घेईल आणि त्याचे टेक कंपन्यांच्या डिलिव्हरी सेंटरमध्ये रूपांतरित करण्यात येईल. अधिग्रहणासाठी कंपनीचे 100 % इक्विटी शेअर्स घेण्याचाही पर्याय असेल. दर्शिता सदर्न इंडिया हॅपी होम्स कंपनी सप्टेंबर 2004 मध्ये स्थापन झाली आहे. मालमत्ता अद्याप विकासाधीन असल्याने या कंपनीची व्यावसायिक उलाढाल शून्य आहे.
TCS ने युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी, व्हँटेज टॉवर्सशी भागीदारी केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला, TCS ने युरोप-आधारित टेलिकॉम टॉवर ऑपरेटर व्हँटेज टॉवर्ससोबत भागीदारीची घोषणा केली. कराराचा एक भाग म्हणून, TCS संपूर्ण युरोपमध्ये टेलिकॉम टॉवर स्थापनेसाठी त्यांची जमीन भाड्याने घेणाऱ्या मालमत्ता मालकांसाठी सेवा प्रक्रिया सुलभ करण्यासाठी डिजिटल सेवा प्लॅटफॉर्म लाँच करेल. व्हँटेज टॉवर्स ही युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम टॉवर ऑपरेटर कंपनी आहे. व्हँटेज टॉवर्ससाठी रिटेंशन वाढवणे आणि टेलिकॉम साइट भागीदारी मजबूत करणे हे देखील यामागील उद्दिष्ट आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List