Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम पहिल्या सुनावणीला गैरहजर, पुढील सुनावणी 26 मार्चला

Santosh Deshmukh Case : उज्ज्वल निकम पहिल्या सुनावणीला गैरहजर, पुढील सुनावणी 26 मार्चला

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पहिल्या सुनावणी बुधवारी केज न्यायालयात पार पडली. यावेळी या प्रकरणातील सरकारी वकील उज्ज्वल निकम हे प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर होते असे समजते.

सुनावणीच्या वेळी या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर इतर आरोपी हे प्रत्यक्ष न्यायालयात हजर होते. या प्रकरणी सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितल्यानंतर न्यायमूर्तींनी 26 मार्च पर्यंत सुनावणी पुढे ढकलली.

अवादा कंपनीकडे मागण्यात आलेल्या दोन कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केला म्हणून कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा जीवश्च कंठश्च वाल्मीक कराडच  संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा स्पष्ट उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रदीप घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे हे या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी असून आठवा आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;