नरबळीसाठी मुलीची मागणी करीत भक्ताला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नरबळीसाठी मुलीची मागणी करीत भक्ताला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, महिलेच्या तक्रारीवरून भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

भोकरदन तालुक्यातील वाळसा वडाळा गावातील ज्ञानेश्वर भिका आहेर या 30 वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दहा दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेनंतर आत्महत्या करणाऱ्या आहेर यांच्या पत्नी अंजना ज्ञानेश्वर आहेर यांनी भोकरदन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत एका भोंदूबाबाच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले. या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी भोंदूबाबाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील गुम्मी गावातून ताब्यात घेतले.

ज्ञानेश्वर भिका आहेर पत्नी अंजना व मुलीसोबत बुलढाणा जिल्ह्यातील चामनगाव (धाड) या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते. भोंदूबाबाशी त्याची ओळख झाली. या ओळखीतून भोंदूबाबा यांनी मोबाईल नंबर आणि गावाचा पत्ता घेत अंजनावर वाईट नजर ठेवून फोन करून आणि चिठ्ठी पाठवून त्रास देण्यास सुरुवात केली.

वारंवार ज्ञानेश्वर याला फोन करून आणि चिठ्या पाठवून तुझी मुलगी ईश्वरी ही माझीच आहे. ईश्वरी मला पाहिजे नाहीतर मी तुमच्यावर 5 से 10 लाखांचा मानहानीचा दावा दाखल करेल, असे म्हणत सतत त्रास दिला. त्रासाला आणि बदनामी होईल या भीतीने ज्ञानेश्वर यांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले.

पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता आरोपी भोंदूबाबा गणेश लोखंडे याला गुप्तधनासाठी नरबळी देण्यासाठी पायाळू मुलगी हवी होती. त्यासाठी त्याने ईश्वरी हिची मागणी केली होती. पती पत्नीने नकार दिल्याने या बाबाने एका वकिलामार्फत पती-पत्नीला सहा लाखांची नोटीसही बजावली होती. या भोंदूबाबाने नरबळीसाठी खड्डाही करून ठेवल्याची धक्कादायक बाब पोलीस चौकशीत समोर आली. त्यामुळे तो या पती-पत्नीला ब्लॅकमेल करत होता.

घाबरलेल्या ज्ञानेश्वरने आत्महत्या केल्याचेही तपासात उघड झाले. भोकरदन पोलिसांनी नरबळी देण्यासाठी मलीची मागणी करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आरोपी भोंदूबाबा गणेश लोखंडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणी बाबा सोबत आणखी कोण होत का? याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, भोकरदन पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;