कसोटी क्रिकेटचे दीडशतक गुलाबी! शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची तयारी सुरू, 2027 मध्ये MCG वर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात दिवस-रात्र कसोटी

कसोटी क्रिकेटचे दीडशतक गुलाबी! शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाची तयारी सुरू, 2027 मध्ये MCG वर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात दिवस-रात्र कसोटी

तब्बल 148 वर्षांपूर्वी म्हणजे 15 ते 19 मार्च 1877 साली ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पहिला कसोटी सामना रंगला होता. आता या सामन्याला लवकरच दीडशतक पूर्ण होणार आहे आणि कसोटी क्रिकेटचे दीडशतक ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरच (एमसीजी) साजरे केले जाणार आहे. येत्या 11 ते 15 मार्च 2027 दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातच एकमेव कसोटी सामना संस्मरणीय करण्यासाठी गुलाबी चेंडूने दिवसरात्र खेळवून कसोटी क्रिकेटचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरे करण्याची योजना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आज जाहीर केली.

मूळ क्रिकेट असलेल्या कसोटीचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करण्यासाठी एमसीजीने पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. आतापर्यंत कसोटी क्रिकेटचा प्रत्येक महोत्सव एमसीजीवरच साजरा केला गेला आहे. पहिला कसोटी सामना खेळला गेल्यानंतर 1927 साली कसोटीचा सुवर्णमहोत्सव त्यानंतर 1977 साली कसोटीचा शतक महोत्सव ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याने आजवर साजरा केला गेला आहे. तीच परंपरा दीडशतक महोत्सवी सामन्यातही पाळली जाणार आहे. पहिली कसोटी 45 घावांनी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाने कसोटीचा शतक महोत्सवही 45 घावांनीच जिंकला होता. दीडशतक महोत्सवाचा जल्लोषही साजरा करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उत्सुक आहे. हा कसोटी सामना संस्मरणीय करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आतापासून कंबर कसली आहे.

शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाला बॉक्सिंग डेसारखा माहोल

एमसीजीवर दरवर्षी 25 डिसेंबरला खेळविल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला जशी अभूतपूर्व गर्दी होते. तशीच वातावरण निर्मिती या दीडशतक महोत्सवी सामन्यासाठी केली जाणार आहे. या कसोटीच्या निमित्ताने क्रिकेटप्रेमींची हाऊसफुल्ल गर्दी लाभेल, असा विश्वास क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आताच व्यक्त केला आहे. सुमारे 95 हजारांपेक्षा अधिक आसनक्षमता असलेल्या या स्टेडियममध्ये 5 हजारांपेक्षा अधिक प्रेक्षकांची उभे राहण्याचीही सोय आहे. आजवरच या स्टेडियममध्ये 93 हजारांची अधिकृत उपस्थितीचा विक्रम 2015 च्या वन डे वर्ल्ड कप फायनल दरम्यान झाला होता. तो विक्रम या लढतीदरम्यान मोडला जाऊ शकतो. पहिली कसोटी आणि शंभराव्या वर्षातील कसोटी 15 ते 19 मार्चदरम्यान एमसीजीवर खेळविली गेली होती. मात्र या कसोटीला जास्तीत जास्त उपस्थिती लाभावी म्हणून ही 11 ते 15 मार्च दरम्यान खेळविली जाणार आहे.

अत्यंत व्यस्त कार्यक्रमात कसोटी

कसोटी क्रिकेटचा शतकोत्तर सुवर्णोत्सव अत्यंत व्यस्त कार्यक्रमात आयोजित केला जाणार आहे. या एकमेव कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हिंदुस्थानचा संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. तसेच ही कसोटी आयपीएल हंगामाशीही भिडणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा सामना जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा भाग नसणार. याच वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान आयसीसी वर्ल्ड कप खेळविला जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;