शेफ विष्णू मनोहर यांचे फेसबूक पेज हॅक, पेजवरून अश्लील व्हिडीओ केले पोस्ट! विष्णूजींवर आली रडण्याची वेळ

शेफ विष्णू मनोहर यांचे फेसबूक पेज हॅक, पेजवरून अश्लील व्हिडीओ केले पोस्ट! विष्णूजींवर आली रडण्याची वेळ

ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याने त्यांच्यावर अक्षरशः रडण्याची पाळी आलेली आहे. विष्णू मनोहर यांचे फेसबुक अकाऊंट हॅकर्सने हॅक केले असून, सदर अकाऊंटवरुन हॅकर्सने अश्लील व्हिडीओ पोस्ट केले आहे. त्यामुळेच विष्णू मनोहर यांनी सायबर क्राइमकडे तसेच फेसबुकच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केलेली आहे.

मास्टर रेसिपी हे विष्णू मनोहर यांचे महाराष्ट्रीयन रेसिपीचे चॅनल आहे. या चॅनलच्या माध्यमातून रेसिपी करुन विष्णूजी महाराष्ट्रासह देशातही लोकप्रिय झालेले आहेत. विष्णू मनोहर यांच्या नावावर पाककृती करण्यासंदर्भातील अनेक रेकाॅर्ड केलेले आहेत. मास्टर रेसिपी या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते विविध प्रांतातील पाककृती या खवैय्यापर्यंत पोहोचवतात. मास्टर रेसिपी या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध चवी आणि खाद्यपरंपरा यांचा अनुभव घ्यायला मिळतो. त्यामुळेच विष्णू मनोहर हे नाव घराघरामध्ये पोहोचले.

विष्णू मनोहर यांचे ‘मास्टर रेसिपी’ या नावाचे फेसबुकवर पेज असून, यावर  देखील व्हिडीओ पोस्ट केले जातात. या चॅनलवर सध्याच्या घडीला चार लाख सबस्क्रायबर्स असून, याच पेजवरुन विष्णूजी पाककृती रेसिपी आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. परंतु याच पेजवर अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तब्बल दीड लाख फाॅलोवर्स कमी झाल्याचे सांगताना विष्णूजींच्या डोळ्यात अश्रू होते.

विविध भागातील खाद्यसंस्कृती तळागाळातील खवैय्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी विष्णूजी सदैव प्रयत्न करत असतात. या आधी सुद्धा विष्णूजींचे अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यावेळी त्याचा बंदोबस्त करण्यात त्यांना यश मिळाले होते. परंतु सध्याच्या घडीला मात्र हॅकर्सने अकाऊंटवरुन अश्लील व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे, विष्णूजींना चांगलाच मनस्ताप झालेला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;