प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ, अंतरिम जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे HC चे आदेश

प्रशांत कोरटकरच्या अडचणीत वाढ, अंतरिम जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे HC चे आदेश

छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाला दिले आहेत.

कोरटकरच्या अंतरिम जामिनाची मुदत आज संपत आहे. अशात न्यायालयाने दिलेल्या या आदेशामुळे त्याच्या अडचणी वाढल्या असून त्याच्यावर अटकेची टांगती तलवार कोरटकरच्या डोक्यावर आहे.

कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन दिला आहे. मात्र अंतरिम जामीन न देता त्याच्या अटकपूर्व जामिनावर अंतिम निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य शासनाने अपील याचिकेत केली आहे. कोरटकरने अंतरिम जामिनाच्या काही अटींचे उल्लंघन केले आहे, असा दावाही राज्य शासनाने केला आहे. तसेच आमची बाजू न ऐकताच कोल्हापूर सत्र न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केला, असा दावा मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी केला. हा दावा न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या एकल पीठाने मान्य केला आणि अंतरिम जामीन अर्जावर नव्याने सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले.

काय आहे प्रकरण?

छावा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी आपली भूमिका मांडली होती. हा ब्राह्मण द्वेष असल्याचा आरोप करत तथाकथित पत्रकार कोरटकरने इतिहास अभ्यासक सावंत यांना फोन करून शिवीगाळ केली होती. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. याप्रकरणी कोल्हापूर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अटकपूर्व जामिनासाठी कोरटकरने कोल्हापूर न्यायालयात अर्ज केला. कोल्हापूर न्यायालयाने कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर केला होता. याची मुदत आज संपत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;