बदलापूर एन्काउंटर प्रकरण; पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायला हवा, हायकोर्टात अ‍ॅम्युकस क्युरी मंजुळा राव यांचा दावा

बदलापूर एन्काउंटर प्रकरण; पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायला हवा, हायकोर्टात अ‍ॅम्युकस क्युरी मंजुळा राव यांचा दावा

बदलापूर एन्काऊंटर प्रकरणातील दोषी पोलिसांविरोधात गुन्हा नोंदवायला हवा. कारण हा एन्काऊंटर प्रथमदर्शनी बनावट असल्याचा निष्कर्ष न्यायालयीन चौकशी अहवालात नोंदवण्यात आला आहे, असा दावा सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आला.

बदलापूर बाल अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर नसून पोलिसांनी त्याची हत्या केली आहे. या बनावट एन्काऊंटरचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेमार्फत करावा, अशी मागणी करणारी याचिका शिंदेच्या वडिलांनी केली. नंतर ही याचिका मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. न्यायालयाने या प्रकरणात बाजू मांडण्यासाठी वरिष्ठ वकील मंजुळा राव यांची अॅम्युकस क्युरी म्हणून नियुक्ती केली. न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरू आहे. आरोपीचा कोठडीत मृत्यू झाल्यास नेमके काय करावे यासाठी  सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. अक्षयचा एन्काऊंटर झाल्यानंतर या मार्गदर्शक तत्त्वानुसार  कार्यवाही झाली आहे. त्यामुळे स्वतंत्र गुन्हा नोंदवण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते का, असा मुद्दा विशेष सरकारी वकील अमित देसाई यांनी उपस्थित केला. याला अॅड. मंजुळा राव यांनी विरोध केला. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाच संशायस्पद आहे. हा एन्काऊंटर बनावट असल्याच्या आरोपात तथ्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयीन अहवालात नोंदवला आहे. अक्षयचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवायला हवा, असा युक्तिवाद अॅड. राव यांनी केला.

तक्रारीची दखल घ्यायला हवी

हा एन्काउंटर खोटा असल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याची पोलिसांत तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी गुन्हा नोंदवायला हवा होता, असेही अॅड. राव यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;