बड्या थकबाकीदारांवर जप्ती, सीलची कारवाई; केवळ दोन आस्थापनांकडे 21 कोटींची थकबाकी

बड्या थकबाकीदारांवर जप्ती, सीलची कारवाई; केवळ दोन आस्थापनांकडे 21 कोटींची थकबाकी

मालमत्ता कर थकविणाऱ्या बड्या थकबाकीदारांविरोधात मुंबई महानगरपालिकेने जप्ती, लिलाव कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या मोहिमेत करनिर्धारण व संकलन खात्याने आज 2 मालमत्तांवर जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही सुरू केली. या मोहिमेत दोन खासगी विकासकांच्या मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये भूखंड मालमत्ता करापोटी 1 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) प्रमाणे या दोन थकबाकीदार आस्थापनांकडे दंड रकमेसह एकूण 21 कोटी 63 लाख 56 हजार 867 रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे संबंधित थकबाकीदारांनी 21 दिवसांत करभरणा न केल्याने आता मालमत्ता जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार आणि सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) विश्वास शंकरवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्व संबंधितांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे.

या थकबाकीदारांना दणका

माझगाव (ई विभाग) येथे सुमेर बिल्ट कार्पेरेशन प्रायव्हेट लिमिटेड यांचा भूखंड आहे. भूखंडाच्या करापोटी कर निर्धारण व संकलन विभागाने 11 फेब्रुवारी 2025 रोजी मागणीपत्र जारी केले होते. मात्र मुदतीत करभरणा केला नाही. त्यामुळे जप्ती आणि अटकावणीची कार्यवाही सुरू केली आहे. यामध्ये 18 कोटी 1 लाख 36 हजार 164 रुपयांचा करभरणा केला नाही तर भूखंड लिलावाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. मुलुंड (टी विभाग) येथील गव्हाणपाडा गाव येथील आर.आर. डेव्हलपर्स यांच्याकडे 3 कोटी 62 लाख 20 हजार 703 रुपयांची थकबाकी आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;