Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा नवरा अखेर बोलला… सांगितलं टॉप सिक्रेट!

Madhuri Dixit: माधुरी दीक्षितचा नवरा अखेर बोलला… सांगितलं टॉप सिक्रेट!

जयपूरमध्ये आयोजित IIFA अवॉर्ड्स 2025 मध्ये अनेक बडे स्टार्स उपस्थित होते. बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितने पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत या कार्यक्रमाला हजेरी लावली. पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने न्यूज9ने माधुरी आणि तिचे पती डॉ.नेने यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी डॉ. नेने आणि माधुरी यांनी भारतीय चित्रपटात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)च्या वापराविषयी चर्चा करताना दिसले. डॉ. नेने यांनी सिनेमात एआय वापरण्याचे फायदेही सांगितले.

माधुरी दीक्षितने AI वर आपले मत मांडताना सांगितले की, ‘ही फक्त सुरुवात आहे. ते कलाकारांची जागा घेतील असे जे लोक म्हणतात त्यावर मला विश्वास बसत नाही. मला वाटतं हे व्हायला अजून बराच वेळ लागणार आहे.’ माधुरी हेही म्हणाली की AI इतर अनेक गोष्टी करू शकते हे तितकेच खरे आहे. श्रीराम नेने म्हणाले की, आम्ही त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहोत. याचा अर्थ असा नाही की तुम्ही रचनात्मकतेला रिप्लेस करत आहात.

श्रीराम नेने म्हणाले की, ‘जर कलाकारांचे डुप्लिकेट लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) द्वारे तयार केले जाऊ शकतात, तर ते त्यांच्याइंटेलेक्चुअल प्रॉपर्टी (IP) द्वारे देखील पैसे कमवू शकतात. तुम्ही विचार करा जर माधुरीने एका वर्षात १० सिनेमांमध्ये काम केले आणि तिने हे सगळे काम एकदाच केले तर… आणि तिने प्रत्येक सिनेमासाठी पैसे घेतले आहेत. अमेरिकेमध्ये अनेक लेखक याविषयी लेख लिहिताना दिसतात. आता लोक स्क्रिप्ट री-राइटिंगसाठी चॅट GPTचा वापर करत आहेत. यामुळे कामाची कार्यक्षमता वाढेल. आमची फिल्म कंपनी आहे. आम्ही एक चित्रपट नेटफ्लिक्सला आणि दुसरा चित्रपटगृहांना विकला आहे. जर आपण एकत्र आणि चांगले काम केले तर लेखकांना रि-राइट करण्यासाठी सोपे होईल.’

‘याला घाबरण्याची गरज नाही’

‘मला नाही वाटत याला घाबरण्याची गरज आहे. मला वाटते आपण या गोष्टीला आपलेसे करायला हवे. विचार करा जर आम्ही चांगले काम करण्यासाठी किंमत कमी केली तर कलाकारांना पैसे कमावण्यासाठी अनेक मार्ग उपस्थित होतील,’ असे डॉक्टर नेने म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;