मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी, हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे – उद्धव ठाकरे

मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी, हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे – उद्धव ठाकरे

आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. पण कॉन्ट्रॅक्टरसाठी (कंत्राटदारांची) भरपूर काही आहे. हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे, अशी टीका राज्याच्या अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया देताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. पत्रकार परिषद घेऊन ते असं म्हणाले आहेत. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते.

माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की, “याही वर्षी अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. मला आचार्य अत्रे यांची आठवण आली. आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की, गेल्या 10 हजार वर्षात एवढा बोस अर्थसंकल्प मी पाहिला नव्हता.अर्थसंकल्पाचं सार काढायचं झालं तर, उद्या सूर्य उगवणार आहे. सर्वांना प्रकाश मिळणार आहे. व्हिटॅमिन डी सुद्धा तुम्हाला त्यातून मिळणार, अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे. निवडणुकीच्या काळात महायुतीकडून वारेमाप जाहिराती करण्यात आल्या होत्या.”

ते म्हणाले, “आमच्या सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्तीची घोषणा केली नाही तर, घोषणा करून त्यांची अंमलबजावणी केली होती. या सरकारने त्या जाहिरातीत म्हटलं होतं की, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू. अर्थसंकल्पात कर्जमुक्तीबद्दल काही नाही. लाडक्या बहिणींबद्दल या अर्थसंकल्पात प्रेम दिसलं नाही. मात्र कॉन्ट्रॅक्टरचं प्रेम यांचं तसंच कायम आहे किंवा ते वाढलं आहे. महाराष्ट्राला कर्जबाजारी करणारा पोकळ असा हा अर्थसंकल्प आहे.”

उद्धव ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या काळातील महायुतीची एक जाहिरात दाखवत उद्धव ठाकरे म्हणाले की, मारल्या थापा भारी अन् महाराष्ट्र केला कर्जबाजारी, ही ओळख घेऊन आता त्यांनी पुढे जायला हवं. आम्ही थापा मारू, पण थापा मारण्याचं आम्ही थांबणार नाही, हे त्यांचं घोषवाक्य झालं आहे.”

हा अर्थसंकल्प लाडक्या कॉन्ट्रॅक्टरसाठी आहे, अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आजच्या या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी काहीच नाही. पण कॉन्ट्रॅक्टरसाठी (कंत्राटदारांची) भरपूर काही आहे. मुंबईमध्ये 64 हजार 783 कोटींची विकासकामं आहेत, याने कसला आणि कोणाचा विकास होणार आहे. यात फक्त कॉन्ट्रॅक्टरचा विकास होणार आहे. कारण, आताच मुंबईत काही रस्ते खोदून ठेवले आहेत. त्यातच आणखी एक महत्वाचा म्हणजे मुद्दा म्हणजे मेट्रोने दोन विमानतळं जोडण्याचं काम सरकार करणार आहे. हे काम अदानी यांचं आहे. कारण विमानतळाची कामे आणि जागा जर अदानी यांना दिली असेल तर, हे काम अदानी यांनी केलं पाहिजे, हे सरकारचं काम नाही. उद्या तुम्ही (महायुती सरकार) म्हणाल, अदानी यांना विमानतळाची जागा दिली आहे, त्यावर धावपट्टी बांधून देऊ. केवळ तुम्ही तुमच्या मालकाच्या मित्राच्या हिताची कामे करत आहेत, त्यातलंच हे एक काम आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;