धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी

धोनी है तो जीत होनी है; ‘छावा’मधील कवी कलश साकारणारा अभिनेता खऱ्या आयुष्यातही कवी

सध्या सगळीकडे १४ फेब्रुवारी प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ सिनेमाची चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटात कवी कलश ही भूमिका अभिनेता विनीत कुमार सिंगने साकारली होती. त्याने एका शोमध्ये भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीवर लिहिलेली कविता सादर केली होती. ही कविता सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाली आहे.

विनीत कुमार सिंगने कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने महेंद्रसिंग धोनीवर कविता केली होती. त्याने सिनेमामध्ये साकारलेल्या भूमिकेप्रमाणे खऱ्या आयुष्यातही कवी आहे याचा अनुभव येतो.

काय आहे विनीत कुमारची कविता?

लंब-दंड, गोल-पिंड धरपकड प्रतियोगिता
लंब-दंड हू प्रचंज विमान सा है मारता
धोनी है, रे भैया धोनी है
धोनी है, रे जीत होनी है

शांत-चिंत हर परिस्थिती में जो खडा रहे
हर धरा पे अंगद के पाँव सा अडा रहे
नीतीयों के जोड-तोड हर घडी विचारता
मौके पे तरकश से राम-बाण मारता

गोल-पिंज हुरर हर दिशा में देखो उड चली
लंब-दंड है गदा सा भाँजता महाबली
हर हवा को काटता है, संकटो को चाँटता है
प्रतिवादी के हृदय में मच गयी है खलबली
ओह माय गॉड धड धड धड धड धड
धोनी है, रे भैया धोनी है
धोनी है, रे जीत हौनी है

युद्ध की हुँकार है रे, ऊर्जा अपार है
मंद-मंद मुस्कुरा के तोड अंहकार है
विश्व भर की जीत है रे, फिर भी जो विनीत है
कीर्तीयों का केंद्र है, रे नाम ही महेंद्र है

नील वस्त्र धरती कर जो विजय ध्वज फैराये
श्वेत-हरीत-केसरीया दस दिशा मैं लहराये
भारत की ख्याती जन-जन तर पहुचाना है
आज फिर इस भूमी पे ध्वज को लहराना है

सोशल मीडियावर विनीत कुमार सिंगने धोनीवर केलेली ही कविता पुन्हा एका चर्चेत आली आहे. ही कविता महेंद्र सिंग धोनीपर्यंत पोहोचावी आणि त्याने ती वाचावी अशी इच्छा देखील विनीतने व्यक्त केली होती.

‘छावा’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन हे लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल दिसत आहे, त्यांची पत्नी येसुबाईंची भूमिका अभिनेत्री रश्मिका मंदानाने साकारली आहे तर औरंगजेब ही भूमिका अभिनेता अक्षय खन्नाने साकारली आहे. या चित्रपटात काही मराठी कलाकार देखील दिसले आहेत. त्यामध्ये संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांचा समावेश आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;