युजवेंद्र चहलसोबत ‘मिस्ट्री गर्ल’ शेअर केलाय खास व्हिडीओ, व्हिडीओ पोस्ट ती म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’

युजवेंद्र चहलसोबत ‘मिस्ट्री गर्ल’ शेअर केलाय खास व्हिडीओ, व्हिडीओ पोस्ट ती म्हणाली, ‘सांगितलं होतं ना…’

Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्युझीलंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला. भारतीय क्रिकेट संघाच्या यशानंतर संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साहाचं वातावरण आहे. दरम्यान, सामन्या दरम्यान एक व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला तो म्हणजे युजवेंद्र चहल… दुबईत रंगलेल्या सामन्यात युजवेंद्र एका ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसला. घटस्फोटानंतर एका ‘मिस्ट्री गर्ल’ सोबत दिसल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, ‘मिस्ट्री गर्ल’ने देखील सोशल मीडियावर व्हिडीओ आणि काही फोटो पोस्ट केले आहे.

सध्या ‘मिस्ट्री गर्ल’ची सोशल मीडिया पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, व्हिडीओसाठी तिने लिहिलेल्या कॅप्शनने देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे. व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करत ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणाली, ‘सांगितलं होतं ना जिंकवून येईल… मी भारतीय संघासाठी लकी आहे…’ तिच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahvash (@rj.mahvash)

 

युजवेंद्र याच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री गर्ल’बद्दल सांगायचं झालं तर, तिचं नाव आरजे मैहवश आहे. दिल्ली येथील प्रसिद्ध रेडियो जॉकी आहे. सोशल मीडियावर देखील मैहवश कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे 1.7 मिलियन फॉलोअर्स आहे. तर मैहवश फक्त 590 जणांना फॉलो करते.

मैहवश आणि युजवेंद्र यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, यापूर्वी देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण तेव्हा मैहवशने आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असं सांगितलं होतं. पण आता दोघांना एकत्र पाहिल्यानंतर अफेअरच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

युजवेंद्र आणि धनश्री

युजवेंद्र आणि धनश्री यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, एकमेकांना अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या लग्नाला 4 वर्ष झाली. पण गेल्या काही दिवसांपासून सतत दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.  दोघांचा घटस्फोट झालाय असं देखील सांगण्यात येत आहे.  दोघांनी देखील त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;