Holi Thandai- होळीसाठी घरीच करा साधी सोपी थंडाई, उन्हाळ्यात थंडाई पिणे आहे खूप फायद्याचे!

Holi Thandai- होळीसाठी घरीच करा साधी सोपी थंडाई, उन्हाळ्यात थंडाई पिणे आहे खूप फायद्याचे!

थंडाई हे उन्हाळ्याच्या दिवसात खूप चविष्ट, ताजेतवाने आणि ऊर्जा देणारे पेय आहे. दररोज सकाळी एक ग्लास थंडाई प्यायलात तर उन्हामुळे होणारे रक्तस्त्राव यासारख्या समस्यांपासून संरक्षण होईल. तयार थंडाई बाजारातूनही खरेदी करता येते, परंतु घरी बनवलेली थंडाई भेसळ नसलेली असल्यामुळे तुमच्या आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल. थंडाईमुळे शरीराला उर्जा तर मिळतेच, सोबत शरीराला थंडावाही मिळतो. थंडाईमध्ये असलेले गरम मसाले हेच थंडाईचे खरे वैशिष्ट्य आहे. थंडाई पिण्यामुळे उन्हाळ्यात होणारी जळजळ आणि पित्त नाहीसे होण्यास मदत होते.

 

 

 

थंडाई

थंडाई रेसिपीसाठी साहित्य
बदाम – ⅓ कप

खरबूजाच्या बिया – ¼ कप

बडीशेप – ¼ कप

खसखस – ¼ कप

वेलची – 15 (सोललेली)

काळी मिरी – 1 टीस्पून

साखर – 2.5 कप

गुलाबजल – 1 टेबलस्पून

थंडाई कशी बनवायची

एका भांड्यात साखर आणि दीड कप पाणी मिसळा 5 ते 6 मिनिटे उकळवा आणि थंड होऊ द्या. त्यानंतर बडीशेप, काळी मिरी, बदाम, खरबूजाच्या बिया, वेलची आणि खसखस ​​स्वच्छ धुवून घ्या आणि त्यांना प्रत्येकी एक तास पाण्यात भिजवा. (रात्रभर भिजवु शकता )

 

सर्व ड्रायफ्रूटस् मधून जास्तीचे पाणी काढून टाका. बदाम सोलून घ्या. सर्व ड्रायफ्रुटस् एकत्र बारीक करा. या गोष्टी बारीक करण्यासाठी पाण्याऐवजी साखरेचे पाणी वापरा.

 

साखरेच्या पाण्यात बारीक वाटलेले मिश्रण गाळून घ्या. गुलाबजल घालावे आता  थंडाई तयार आहे, थंडाई हवाबंद बाटलीत भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. तुम्ही ते १ महिन्यापेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू शकता.

 

जेव्हा तुम्हाला थंडाई प्यायची असेल तेव्हा गरजेनुसार बर्फ आणि दूध घाला आणि थंडाई प्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;