आमदार धसांच्या लाडक्या खोक्याभाईच्या घरावर धाड, शिकारीचे साहित्य सापडले

आमदार धसांच्या लाडक्या खोक्याभाईच्या घरावर धाड, शिकारीचे साहित्य सापडले

भाजपचे आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाई उर्फ सतीश भोसलेच्या घरावर वन विभागाने धाड टाकली. या धाडीत शिकारीचे मोठे साहित्य सापडल्याने खळबळ उडाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

शिरूर तालुक्यातील एका व्यक्तीस अमानुष मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार सुरेश धस यांचा हा लाडका कार्यकर्ता प्रकाशझोतात आला. दहशतीपोटी कोणीही तक्रार देण्यास धजावत नसल्यामुळे पोलिसांनीच स्वतः फिर्याद दिली. त्यानंतर या खोक्याभाईवर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर लगेचच या खोक्याभाईचा दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. दरम्यान, हा खोक्याभाई हरीण, काळवीट, ससे, मोरांची शिकार करण्यात पारंगत असल्याचा आरोप वन्यजीवप्रेमींनी केला. आज या खोक्याभाईच्या घरावर वन विभागाने धाड टाकली. खोक्याभाईच्या घरावर टाकलेल्या धाडीत वन विभागाला शिकारीचे मोठे साहित्य सापडल्याचे सांगण्यात आले. धारदार शस्त्र, वन्यजीव पकडण्याच्या जाळ्या, वाघूर आदींचा यात समावेश आहे. शिकार केलेल्या प्राण्यांचे वाळलेले मांसही आढळून आले. जिल्हा वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली ४० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही धाड टाकली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;