Soyabean सोयाबीनचे दर गडगडले, तुरीचे भाव चार हजाराने घसरले

Soyabean सोयाबीनचे दर गडगडले, तुरीचे भाव चार हजाराने घसरले

हंगामातील हरभरा ज्वारीची काढणी झाल्यानंतर बाजारात विक्रीसाठी आणला जात आहे. मात्र शेतकऱ्यांच्या घरात माल आल्यानंतर भावात घसरण होत असल्याचे याही वर्षी पुन्हा एकदा पहावयास मिळत आहे. सध्या तूर, हरभऱ्याची आवक वाढली आहे. तूर ४ हजार रुपये, हरभरा ५०० रुपयांनी खाली आले आहेत. शेतकऱ्याचे पिवळे सोने म्हणजे सोयाबीनचे दर एक हजार रुपयांनी खाली आले आहे.

मंठा तालुक्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीने यंदा कंबरडे मोडले उत्पादन खर्च ही निघणे मुश्किल झाले. इतका निचांकी दर सोयाबीनला मिळत आहे. भरीस भर म्हणजे सरकारने सोयाबीन खरेदी बंद केल्याने खुल्या बाजारात हरभरा, सोयाबीन, तूर, ज्वारी या शेतकरी धान्याचे गेल्या दहा ते बारा वर्षांतील निचांकी दर गाठले. या दहा ते बारा वर्षांत पेरणीचे दर गगनाला भिडलेले असताना पीक काढणीचा हंगाम जवळ आला की सरकार बाहेर देशातील शेती माल आयात करते. त्यामुळे या पिकांचे दर घसरले जातात.

बाहेर देशातील चना, तूर, पाम तेल, सोयापेंड, आयात केल्यामुळे हमीभावापेक्षाही खुल्या बाजारात कमी दर मिळू लागला आहे. दहा वर्षांपूर्वी जेवढा दर मिळत होता. त्यापेक्षाही कमी भाव खुल्या बाजारात शेतकऱ्याच्या पदरात पडतो. अजूनही शेतकऱ्याकडे सोयाबीनसह तूर पडून आहे. खुल्या बाजारात सोयाबीन ३ हजार ८००, हरभरा ५ हजार, तूर ६ हजार ८००, ज्वारी अडीच हजार रुपये, गहू तीन हजार रुपये यापुढे दर मिळत नाही. गेल्या दहा वर्षांपासून खत कीटकनाशके तपासली तर ते दरवर्षी वाढत जाऊन जीएसटीसह दर गगनाला भिडले असल्याने शेतीचा उत्पादन खर्च वरचेवर वाढतोय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;