मीरा-भाईंदर न्यायालयाचे उद्घाटन हा राजकीय मंच नाही, मिंधे गटाच्या बेकायदा बॅनरबाजीवर न्यायमूर्ती अभय ओक यांचा हातोडा
मीरा-भाईंदर न्यायालयाच्या उद्घाटनासाठी आलेले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी आज मिंधेंच्या अनाजीसेनेने केलेल्या बेकायदा बॅनरबाजीवर हातोडा आपटला. न्यायालयाच्या कामाचे श्रेय उपटण्यासाठी ठाण्यापासून भाईंदरपर्यंत मिंधे गटाने केलेल्या बॅनरबाजीवर न्यायमूर्ती ओक यांनी जोरदार तडाखे लगावले.
काही उत्साही राजकारण्यांनी या न्यायालयाचे श्रेय उपटण्यासाठी थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून बेकायदा जाहिरातींचे फ्लेक्स लावले आहेत. त्यासाठी त्यांनी महापालिकेतून परवानगी घेतलेली नाही. त्यावर महापालिकेनेही काहीही कारवाई केलेली नाही. न्यायालयाच्या उद्घाटनाचे, असे राजकीय बॅनर का लावले? मीरा-भाईंदर न्यायालयाचे उद्घाटन हा राजकीय मंच नाही की, राजकीय किंवा नट-नट्यांचा कार्यक्रम नाही. त्यात शिस्त पाळलीच गेली पाहिजे, असे खडेबोल न्यायमूर्ती अभय ओक यांनी सुनावले. तेव्हा व्यासपीठावर असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List