हिंदुस्थानींना बेड्या, साखळदंड; नेपाळींना सन्मानाने पाठवले, नरेंद्र मोदी गप्प का, विरोधकांचा सवाल; देशभरात प्रचंड संताप

हिंदुस्थानींना बेड्या, साखळदंड; नेपाळींना सन्मानाने पाठवले, नरेंद्र मोदी गप्प का, विरोधकांचा सवाल; देशभरात प्रचंड संताप

अमेरिकेने 9 नेपाळी बेकायदा स्थलांतरितांना मायदेशी परत पाठवले. सर्वजण काठमांडू येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. परंतु, त्याच्या हातात बेडय़ा आणि पायात साखळदंड नव्हते. ते अतिशय सहज आणि आनंदाने बाहेर येताना दिसतात. इथे कुठलाही चौकशीचा फार्स नव्हता. त्यांना सन्मानाने मायदेशी पाठवले तर दुसरीकडे हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांना हातात बेडय़ा आणि पायात साखळदंड अशा अवस्थेत कित्येक तास एकाच जागेवर बसवून त्याना मायदेशात पाठवले. असा दुजाभाव अमेरिकेने करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का, असा सवाल विरोधकांनी केला असून देशभरात याप्रकरणी प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांना बेडय़ा आणि साखळदंडाने जखडून लष्कराच्या विमानातून पाठवण्यात आले. ना स्वच्छतागृहात जाण्याची परवानगी होती ना पुरेसे पाणी आणि अन्न देण्यात आले.  लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचीही त्यांना दया आली नाही. नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौरा केला, ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतरही हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांच्या हातातून बेडय़ा निघाल्या नाहीत की साखळदंड… दरम्यान, ट्रम्प हे आपले मित्र असल्याचे मोदी सांगतात, मग बेकायदा स्थलांतरितांना दिलेल्या वागणुकीवर आणि अपमानाबाबत मोदी गप्प का? त्यांना थोडीतरी लाज वाटायला हवी, अशा शब्दांत काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे.

कोलंबियाने सन्मानाने नागरिकांना परत आणले

अमेरिकेने कोलंबियातील बेकायदा स्थलांतरितांना लष्करी विमानाने परत पाठवले. परंतु, कोलंबियाने ही विमाने आपल्या भूमीवर उतरवून दिली नाहीत. त्यानतंर आपली विमाने अमेरिकेत पाठवून आपल्या देशातील नागरिकांना सन्मानाने परत आणले. अमेरिकेने नेपाळी बेकायदा स्थलांतरितांनाही लष्करी विमानाने न पाठवता चार्टर्ड विमानाने मायदेशी पाठवले. त्यांना इतका सन्मान आणि हिंदुस्थानी बेकायदा स्थलांतरितांना अमानुष वागणूक.. असे का? असा सवाल देशभरातील नागरिकांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;