ती असुरक्षित! राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

ती असुरक्षित! राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

राज्यात वाढत असलेल्याया महिला अत्याचाराच्या घटना, बेपत्ता तरुणी व महिलांचे वाढते प्रमाण यावर आज महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

बलात्काराच्या प्रकरणात वाढ होत असताना पुणे स्वारगेट प्रकरणी पोलिस प्रशासन आणि मंत्र्यांच्या वक्तव्यामुळे पीडित महिलेची बदनामी झाली. यामुळे मंत्री योगेश कदम यांचा राजीनामा झाला पाहिजे. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर देखील महिलेने गंभीर आरोप केले असल्याने या मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली.

महिला झाल्या बेपत्ता, सरकारला नाही पत्ता, महिला सुरक्षेचा नुसतं गाजर, सरकारला नाही पाझर, बेटी बचाव जुमला है, ये मंत्री दरिंदा है, अशा जोरदार घोषणा देत मंत्री जयकुमार गोरे व राज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

निवडणुकीत लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार अशी घोषणा महायुतीने केली होती. पण सरकार आल्यावर मात्र लाडक्या बहिणींना अपात्र केले जात आहे, 2100 रुपये कधी देणार? ही भूमिका सरकार स्पष्ट करत नसल्याने महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकार विरोधात विरोधकांनी जोरदार निदर्शने केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;