Kolhapur News – शिवशंभूद्रोही कोरटकर आणि केशव वैद्य यांच्यावर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

Kolhapur News – शिवशंभूद्रोही कोरटकर आणि केशव वैद्य यांच्यावर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या नागपूरच्या शिवशंभूद्रोही प्रशांत कोरटकर आणि केशव वैद्यला अटक करण्याच्या मागणीसाठी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. खानविलकर चौकात इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.

आक्रमक झालेल्या इंडिया आघाडी आणि शिवप्रेमी पदाधिकाऱ्यांना सकाळपासून ताब्यात घेऊन नजरकैदेत ठेवण्यात आले होते. भाजप कार्यालयाच्या शेजारी असलेल्या खानविलकर चौकात सायंकाळी इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आणि शिवप्रेमींनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांशी झटापाट झाली असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कोरटकरसह मुख्यमंत्र्यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

छत्रपतींचा अवमान करणाऱ्या कोरटकर आणि सोलापूरकर यांना अटक करा! विधान परिषद सभागृहात विरोधकांचा ठिय्या

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;