अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती

अपिलाचा निकाल लागेपर्यंत शिक्षेला स्थगिती

शासकीय कोट्यातील सदनिकेचा लाभ घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना झालेल्या शिक्षेला अपिलाचा निकाल लागेपर्यंत आज नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातील शासकीय सदनिकेचा  1995 मध्ये लाभ घेतला आहे. या वेळी त्यांनी कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा गुन्हा सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल केला होता, त्या खटल्याचा निकाल 20 फेब्रुवारी रोजी लागला. कोकाटे बंधूंना प्रत्येकी दोन वर्षांची शिक्षा व प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याविरुद्ध कोकाटे यांनी अपिल केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;