धाराशीव कडकडीत बंद! धनंजय मुंडे यांना सहआरोपी करणार काय? फडणवीसांचा युक्तिवाद, तेवढे पुरावे दिसत नाहीत

धाराशीव कडकडीत बंद! धनंजय मुंडे यांना सहआरोपी करणार काय? फडणवीसांचा युक्तिवाद, तेवढे पुरावे दिसत नाहीत

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांना सहआरोपी करण्यात यावे, या मागणीसाठी धाराशीवकरांनी कडकडीत बंद पाळला. धाराशीव शहरासह परंडा, तुळजापूर, कळंब, ईट, भूम, येरमाळा येथे बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संतोष देशमुख यांच्यावर कराड गँगने केलेल्या अत्याचारांचे पह्टो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाचा आगडोंब उसळला आहे. देशमुखांच्या मारेकऱ्यांचा ‘आका’ वाल्मीक कराड आणि ‘आकाचे आका’ धनंजय मुंडे यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. राक्षसांना फासावर लटकवा अशी मागणी होत असून लातूर जिह्यातील शिरूर अनंतपाळ आणि परभणी जिह्यातील गंगाखेड येथे उद्या बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

बीडमधील लिंबागणेश येथेही उत्स्फूर्त बंद होता. लातूर जिह्यात शिरूर अनंतपाळ येथे बंद पुकारण्यात आला होता. निलंगा येथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या पुतळय़ांचे दहन करण्यात आले. लातुरात ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. परभणी जिह्यातील बोरी येथेही बंदचे आवाहन करण्यात आले होते. जालना जिह्यातील जाफराबाद, राजूरलाही कडकडीत बंद होता.

मुंडेंच्या घरासमोर जोडे मारो

धनंजय मुंडे यांच्यावर पुण्यातील घरापुढे आज त्यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. मुंडे यांना आमदारपदावरून बडतर्फ करा. त्यांना सहआरोपी करून खटला चालवा, अशी मागणी महिलांनी केली.

कराडची मालमत्ता जप्त करणार

‘घरगडी ते अण्णा’ असा प्रवास करणाऱ्या वाल्मीक कराडचे पाय संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी खोलात गेले आहेत. एसआयटीने दोषारोपपत्रासोबतच वाल्मीकच्या संपत्तीवर टाच आणण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. यात वाल्मीकच्या कोटय़वधींच्या महागडय़ा गाडय़ांचा समावेश आहे. कराडकडे आलिशान गाडय़ांची रांगच आहे. पर्ह्ड इंडेव्हर, अशोक लेलँड, जग्वार लँड रोव्हर, जेसीबी इंडिया, मर्सिडिझ बेन्झ, बीएमडब्ल्यू, टोयाटो इनोव्हा या कोटय़वधी रुपये किमतीच्या गाडय़ा वाल्मीककडे कोठून आल्या, याचा शोध एसआयटीला घ्यायचा आहे.

n वाल्मीक कराड हा अनेक मोबाईल फोन वापरत होता. त्यापैकी महत्त्वाच्या तीन आयफोनमधील डेटा त्याने उडवला असल्याचे तपासात समोर आले आहे. हे तीनही मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;