मुंबई शहराची रचना कारसाठी नाहीच! ब्रिटीश वाहतूक तज्ञ वोल्मर यांचे निरीक्षण

मुंबई शहराची रचना कारसाठी नाहीच! ब्रिटीश वाहतूक तज्ञ वोल्मर यांचे निरीक्षण

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची रचना कारसाठी नसल्याचे परखड मत ब्रिटीश वाहतूक तज्ञ ख्रिश्चन वोल्मर यांनी मांडले. मुंबई हे कारसाठी अनुकूल शहर नसून अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. या शहरावर दुचाकी वाहनांनी तर कब्जाच केला आहे हे पाहून मी थक्क झालोय, असे वोल्मर यांनी सांगितले. त्यांनी दोन दिवस संपूर्ण मुंबई शहरात भटकंती केली.

हिंदुस्थानच्या दौऱ्यात वोल्मर यांनी कोलकात्यालाही भेट दिली आणि तेथील रेल्वेचे कौतुक केले. मुंबई हा वोल्मर यांच्या प्रवासाचा शेवटचा थांबा होता. महाराष्ट्राच्या राजधानीत त्यांनी मोनोरेल, भूमिगत मेट्रो आणि उपनगरीय रेल्वेसह इतर सर्व वाहतुकीच्या पर्यायांचा वापर केला. मुंबईतील गर्दी आणि वाहतूक कोंडी हे पाहता अधिकाऱ्यांनी सार्वजनिक वाहतुकीला अधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सुचवले.  शहरातील मेट्रो नेटवर्क पूर्ण झाल्यानंतर प्रवासातील अडचणी कमी होण्यास मदत होईल. येथील भूमिगत मेट्रो जवळजवळ लंडनच्या नवीन क्रॉसरेल किंवा एलिझाबेथ लाईनइतकीच सुसज्ज आहे असे वाटते, असेही ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;