सैफ अली हल्ला प्रकरण; महिन्याअखेर होणार आरोपपत्र न्यायालयात दाखल 

सैफ अली हल्ला प्रकरण; महिन्याअखेर होणार आरोपपत्र न्यायालयात दाखल 

अभिनेता सैफ अली खानवर हल्लाप्रकरणी महिन्याअखेर वांद्रे पोलीस न्यायालयात आरोपपत्र दाखल करणार आहेत. पोलिसांकडे सकारात्मक अहवाल आणि पुरावे असल्याचे सूत्रांनी सांगितले.  जानेवारीत अभिनेता सैफ अली खानवर राहत्या घरी चाकूहल्ला झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता.  वांद्रे पोलिसांनी तपासासाठी अनेक पथके तयार केली. अखेर पोलिसांनी ठाणे येथून बांगलादेशी हल्लेखोर मोहम्मद शरीफुल इस्लामला ताब्यात घेऊन अटक केली होती.  ओळखपरेडदरम्यान अभिनेत्याच्या कर्मचाऱयांनी आरोपीला ओळखले होते. तसेच इमारतीच्या डक्टमध्ये त्याच्या बोटांचे ठसेदेखील जुळल्याचे सूत्रांनी सांगितले. चाकूवर सापडलेले रक्ताचे डाग आणि अभिनेत्याच्या रक्ताच्या नमुन्याशी जुळले आहे. पोलिसांनी 25 हून अधिक जणांचा जबाब नोंदवला आहे. त्यात अभिनेत्री करिना कपूरचादेखील समावेश आहे. शरीफुलचा एक नातेवाईकाचादेखील पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. शरीफुल इस्लामने पश्चिम बंगाल येथे एका महिलेचा फोन चोरला होता. पोलीस सध्या आरोपपत्र अंतिम करत आहेत. येत्या महिन्याअखेर आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;