ऊसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची धडक; अपघातात अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

ऊसाने भरलेल्या बैलगाडीला दुचाकीची धडक; अपघातात अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील पाटोद्याहून छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेसाठी जाणार्‍या अभियांत्रिकेच्या विद्यार्थ्याची दुचाकी विरुद्ध दिशेने येणार्‍या उसाने भरलेल्या बैलगाडीला धडकली. या अपघातात चैतन्य वैद्यनाथ जायभाये (वय 20 रा. काकडहिरा, ता. पाटोदा, जि. बीड) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. हा अपघात धुळे ते सोलापूर महामार्गावर सोमवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जालन्यातील वडीगोद्री डाव्या कालव्या जवळ झाला.

पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील चैतन्य वैद्यनाथ जायभाये हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. त्याची छत्रपती संभाजीनगर येथे सकाळी परीक्षा होती. ही परीक्षा देण्यासाठी चैतन्य पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारस काकडहिरा येथील घरून छत्रपती संभाजीनगरकडे दुचाकीवर निघाला होता. सकाळी वडीगोद्री डाव्या कालव्याजवळ विरुद्ध दिशेने येणार्‍या ऊस वाहतूक करणार्‍या बैलगाडीला दुचाकीची जोरदार धडक बसली. त्यात चैतन्य गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;