Chandrapur: शॉकिंग! प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून जीवन संपवलं

Chandrapur: शॉकिंग! प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून जीवन संपवलं

प्रेमीयुगुलाने वीज टॉवरला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात घडली आहे. उचली शिवारात सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रोहित रमेश लिंगायत (25) आणि एका अल्पवयीन मुलीने आपली जीवनयात्रा संपवली.

उचली येथील रोहित लिंगायत याचे चांदली येथील एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध जुळले. ती भंडारा जिल्ह्यातील एका वसतिगृहात राहून नववीचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील मजुरी करतात. काही दिवसांपूर्वी वसतिगृहातून ती घरी आली होती. तिचे वडील मजुरीला तर आई घरकामात व्यस्त असताना रोहित हा सकाळी दुचाकीवर तिच्या घरासमोर आला. घराबाहेर बोलावून तिला दुचाकीवर बसवून पळवून नेले. आई-वडिलांनी तिच्या मोबाइलवर संपर्क केला. मात्र बंद आढळून आला. त्यामुळे ब्रह्मपुरी पोलिसांत तक्रार केली. उचली शिवारातील वीज टॉवरला गळफास लावून अज्ञात युवक-युवतीने आत्महत्या केल्याचे काही नागरिकांना आढळून आले. ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर मृतक प्रेमीयुगुलाची ओळख पटली. पोलिसांनी मृतकांच्या कुटुंबीयांना बोलावून पंचनामा केला. पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस निरीक्षक करीत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;