तेरी मेहरबानियां…  मालकाला वाचविण्यासाठी श्वानाची वाघासोबत झुंज

तेरी मेहरबानियां…  मालकाला वाचविण्यासाठी श्वानाची वाघासोबत झुंज

असं म्हणतात की, कुत्रा हा प्राणी सर्वात जास्त इमानदार असतो. कुत्रा आपल्या मालकावर जिवापाड प्रेम करतो, जिवावर उदार होऊन मालकाचे प्राण वाचवतो. अशीच एक घटना मध्य प्रदेशातील उमरिया जिह्यात घडलीय. बांधवगड व्याघ्र प्रकल्पाशेजारील भरहुत गावातील जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानाने आपल्या मालकाला वाचविण्यासाठी वाघाशी लढा दिला. जवळपास दोन तास दोघांमध्ये झुंज झाली. श्वानाचा आक्रमकपणा बघून अखेर वाघाला तेथून पळ काढावा लागला.

मात्र या लढाईत गंभीर जखमी झालेल्या श्वानाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. उर्वरित आयुष्य म्हणजे लाडक्या श्वानाचं देणं असल्याची भावना त्याच्या मालकाने व्यक्त केली.  जर्मन शेफर्डचे मालक शिवम बडगैया म्हणाले की, ‘‘शेतात असताना अचानक माझ्यासमोर वाघ आला. वाघ माझ्यावर हल्ला करणारच होता. तितक्यात माझ्या बँथोने (श्वानाचं नाव) वाघाची हालचाल पाहिली. स्वतःच्या जिवाची पर्वा न करता वाघावर हल्ला केला. वाघ आणि श्वानामध्ये दोन तास झुंज सुरु होती. त्याचं धाडस पाहून वाघानं हार मानली. वाघ श्वानाला सोडून पळून गेला. तोपर्यंत गावात वाघ शिरल्याची बातमी गावभर पसरली होती. गावकरी जमा झाले. गावकऱ्यांसह आम्ही जखमी श्वानापर्यंत पोहोचलो. त्याला ताबडतोब डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण तो वाचू शकला नाही.’’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;