देवाभाऊंच्या राज्यात सत्ताधारी मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित, टवाळखोरांनी रक्षा खडसे यांच्या मुलीची भर रस्त्यात छेड काढली
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजप नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींसोबत टवाळखोरांनी भर रस्त्यात छेडछाड केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे शिंदे-फडणवीसांच्या राज्यात सर्वसामान्य घरातील लाडक्या बहिणीच नाही तर सत्ताधारी मंत्र्यांच्या मुलीही असुरक्षित असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List