मोशीतील श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव – मानाच्या विड्याची बोली तब्बल 25 लाखांना!

मोशीतील श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सव – मानाच्या विड्याची बोली तब्बल 25 लाखांना!

संपूर्ण महाराष्ट्रात मानाच्या विड्याच्या लिलावासाठी लाखोंची बोली लावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री नागेश्वर महाराज भंडारा उत्सवातील लिलावामध्ये या वर्षीच्या मानाच्या विड्याला तब्बल 25 लाख रुपयांची बोली लावली गेली. हा विडा मोशीतील जगदीश श्रीपती जाधव-सस्ते यांनी घेतला.

श्री नागेश्वर महाराज यांचा आशीर्वादच जणू आपणास मिळाला, अशी भावना जगदीश जाधव-सस्ते यांनी व्यक्त केली, तर मानाची ओटी रोहिदास विष्णू घिगे (हवालदार) यांनी 17 लाख 52 हजारांना, मानाचे शेवटचे लिंबू 11 लाख 1 हजार 101 रुपयांना आकाश विष्णू सस्ते यांनी घेतली. लिलावाची सुरुवात ज्या विड्याने झाली तो मानाचा पहिला विडा भालचंद्र बोराटे 7 लाख 51 हजार रुपये, पहिले लिंबू संभाजी बबन बोऱ्हाडे 1 लाख 71 हजार रुपयांना घेतले.

देवाच्या दारात पैशाला मोल नाही हेच खरं, याचा प्रत्यय करून देणारा हा लिलाव आहे. त्या लिलावात सुरुवातीपासून शेवटपर्यंत बसणाऱ्याला हे हमखास जाणवतं. नागेश्वर महाराजांच्या सान्निध्यातील वस्तू, प्रसाद घेईल त्याला भरभराट, या अशा शब्दात व भारदस्त आवाजात उत्सवातील लिलावात पुकारा करण्याचे काम नारायण निवृत्ती केदारी, सागर नारायण केदारी यांनी केले.

या वस्तूंचा झाला लिलाव

दरवर्षी या लिलावामध्ये भाविकांना अर्पण केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तू, भंडाऱ्यातील प्रसाद व लिंबू अशा वस्तूंची बोली लावून लिलाव केला जातो. ग्रामस्थांकडून भंडाऱ्यातील महाप्रसाद बनविण्याची भांडी दरवर्षी नव्याने खरेदी केली जातात. मानाची ओटी आणि मानाचे लिंबू हे लिलावातील महत्त्वाचे मानले जातात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;